Place: Dr.RGCA, Buldana | Date: 2026-06-05

बुलढाणा, दि. 05 जून 2026 : इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलढाणा अंतर्गत व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस. एस. सरप यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि हरित भविष्य या विषयांवर आपले विचार मांडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ यांनी पर्यावरण संरक्षणाची आजच्या काळातील गरज अधोरेखित करत प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस. एस. सरप यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ, तसेच एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी एस. एस. सरप सर व इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यावेळी उपस्थिती होते. डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा